खामगांव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कोजागीरी उत्सव संपन्न

खामगाव (का.प्र)- काल दि. 28 ऑक्टो. 2018 वार रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता आई साहेब मंगल कार्यालय घाटपुरी रोड खामगांव येथे सकल मराठा समाज खामगांव च्यावतीने कोजागीरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमा मध्ये मोठ्या संख्येने खामगांव शहर व ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकल मराठा समाजातील बांधवाच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या पुतळयाचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन विदर्भाची पंढरी असलेल्या शेगांव येथील श्री संत गजानन महाराजाच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तर या कोजागीरी निमित्त आयोजित कार्यक्रमात समाजातील राजकारण विरहित विविध क्षेत्रात काम करणार्‍या लोकांचे प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने डॉ., वकील,प्राध्यापक, शिक्षक, तसेच विविध सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या मंडळीने सुध्दा मार्गदर्शनपर भाषणे झाली. या कार्यक्रमामध्ये खामगांव ग्रामीण व शहर भागातील विविध राजकीय क्षेत्रात काम करणारे तसेच सामाजिक संघटनेत काम करणारे शासकीय निमशासकीय सेवेत काम करणारे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांनी समाजातील विविध समस्यांवर चर्चा केली व समाज प्रगतीसाठी आणखी काय काय करता येईल यावर विशेष भर टाकली. या सर्व चर्चेत विशेष चर्चा ही झाली की आपण वेळो वेळी असेच एकत्र येऊन बसलो तर निश्‍चितच समाजातील युवकाचा व समाज बांधवांचा फायदा होईल म्हणून आपण वरचेवर असे कार्यक्रम आयोजन करीत राहु असे ठरले. एकंदरीत हा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्‍न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

349total visits,1visits today