स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला

खामगाव : बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होईपर्यंत एकही मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी राज्याचे कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेगाव खामगाव रोड वर नामदार खोत यांचा ताफा अडवून जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर खोत यांना बुलढाणा जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करा अशी मागणी करणारे निवेदन त्यांना देण्यात आले.