कारंजा येथील ढोपे कुटुंबियांना न्याय मिळवून देणार : राज ठाकरे

वाशिम येथे पदाधिकाºयांशी साधला संवाद
राज ठाकरे यांनी वाशिम येथे विश्रामगृहात मनसे पदाधिकाºयांशी संवाद साधला. यावेळी पदाधिकाºयांनी मनसे जिल्हाध्यक्ष पदाची निवड लवकरात लवकर करावी, अशी गळ घातली. वाशिम जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासंदर्भात चर्चा केली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना केल्या. यावेळी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

वाशिम येथे पत्रकार परिषद टाळली
दरम्यान, २३ आॅक्टोबर रोजी राज ठाकरे हे वाशिम येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे निरोप मनसेच्या पदाधिकाºयांनी माध्यमांपर्यंत पोहोचविले होते. स्थानिक विश्रामगृहात पदाधिकाºयांशी संवाद साधल्यानंतर ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधतील, असे सांगितले जात होते. मात्र, ठाकरे हे पत्रकार परिषद टाळून थेट अकोल्याच्या दिशेने रवाना झाले.