एकनाथराव खडसे म्हणतात, ‘आता निवडणूक लढविण्याची इच्छा नाही’

एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, मी नेहमी युतीच्या विरोधात होतो आणि युती तुटली म्हणून १२२ आमदार भाजपाचे निवडून आले. शिवसेना सत्तेत असून सरकारच्या विरोधात बोलते, शिवसेना म्हणते, कर्जमाफीत घोटाळा झाला आहे, ज्यावेळेस कर्जमाफी दिली त्यावेळेस शिवसेना मंत्री त्यात सहभागी होते, मग त्यांनी विरोध का केला नाही? सत्तेत राहायचे, शिव्या द्यायच्या म्हणजे हे एखाद्या खट्याळ बाईसारखे शिवसेनेचे वागणे आहे. मी विरोधी पक्ष नेता असताना कॉंग्रेस राष्ट्रावाडीचे सिंचन घोटाळे बाहेर काढले. मागील कॉंग्रेस सरकारने कामे केली नाही, असे नाही, पण त्यांनी १५ वर्षात पूर्ण देश, राज्य भ्रष्टाचाराने बोकाळले होते. सध्याच्या परिस्थितीत कॉंग्रेस जवळ संघटन नाही, त्यामुळे भाजपाचे आपले संघटन मजबूत करणे गरजेचे आहे अन्यथा आपलीसुद्धा कॉंग्रेससारखी गत व्हायला वेळ लागणार नाही.
प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विलास चौधरी, तर आभार विजय नरवाडे यांनी मानले.

59total visits,1visits today